पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | संजय राऊतांनी भाजपला फटकारले

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.

राजकारणात एखाद्या व्यक्तीच्या बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढले आहे. यामुळे सरकारला त्रास होईल असं विरोधकांना वाटत आहे. पण विरोधी पक्षाने ठरवलं म्हणून त्या दिशेने चौकशी करायची असं होत नाही’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.विरोधकांनी विरोधकांचं काम करावं. लोकशाहीत ते गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी कालच स्पष्ट शब्दात सांगितलंय की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं रोखठोक मत संजय राऊत यांनी मांडले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’