जास्त दुडूदुडू धावू नका, दम लागून पडाल; राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौरा करत आढावा घेत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दरम्यान राज्यपाल ज्या पद्धतीने दुडूदुडू धावत आहेत, पण तुम्ही दम लागून पडाल असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारं नाहीत. त्या राज्यांमध्ये भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करु इच्छिते. तुम्ही पाहा दिल्लीमध्ये सध्या काय सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्रामध्येही असेच सुरु आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल दुडुदुडू धावत आहेत. धावू द्यात. दम लागू पडाल एकेदिवशी, असा टोला संजय राऊत यांनी राज्यपालांना लगावला.

यावेळी त्यांनी केंद्र सरकार वर देखील निशाणा साधलाय. पेगाससवर चर्चा व्हावी अशी आमची साधी मागणी आहे. या देशात जे काही हेरगिरीचं कांड झालंय ते जाणून घ्यायचा देशाला अधिकार नाही का? सरकार अधिकार नाकारत असेल तर या देशातील लोकशाही आम्ही मोडीत काढली आहे. या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत हे त्यांनी सांगावं, असा हल्ला त्यांनी चढवला

Leave a Comment