नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार? राऊतांनी कारणही सांगितलं

0
239
Sanjay Raut Narayan Rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राणेंचं मंत्रिपद जाणार आहे असा दावाही त्यांनी केला आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले नारायण राणे लाचार माणूस आहे, आत्तापर्यंत त्यांनी १० पक्ष बदलले. माझ्या माहितीनुसार त्यांचे केंद्रीय मंत्रिपद जाणार आहे. शिंदे गटातील लोकांना मंत्रिपद देण्यासाठी काही जणांना काढावं लागेल. आणि नारायण राणे यांचा परफॉर्मन्स शून्य आहे . असं राऊत म्हणाले.

आम्हाला धमक्या वगैरे देऊ नका, आमचं आक्ख आयुष्य रस्त्यावर गेलं आहे. तू किती कानफाडी खाल्ल्या? असा सवाल करत तुम्ही तुमचं काम करा, आमच्यात पडू नका. ज्या पक्षात तुम्ही आहात त्यांचे काम करा. आमच्या नादाला लागला तर आम्ही काय आहे ते कळेल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.