हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासुन अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत हेत. अदानी यांच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कोणाचे असा सवाल त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. हाच धागा पकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदींवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यानी महाभारतातील एका प्रसंगाचा उल्लेकही केला. सांग धर्मराजा, अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते नेमके काय? अदानी यांच्या भ्रष्टाचाराचे संरक्षक म्हणून पंतप्रधान पहाडासारखे का उभे आहेत? अदानी यांच्या कंपनीत बेकायदेशीरपणे गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये नक्की कोणाचे? असे प्रश्न श्री. गांधी यांनी विचारले. त्या प्रत्रांची उत्तरे निदान ‘ईडी’ आणि सीबीआयने तरी द्यायला हवीत. मात्र खन्या चोराना संरक्षण व दरोडेखोरांना प्रतिष्ठा देण्याचे काम या दोन्ही संस्था आज करीत आहेत. मोदी म्हणतात, ‘सत्तर वर्षात काँग्रेस सरकारने काहीच केले नाही. फक्त सात वर्षात भाजपने देश प्रगतीपथावर नेला. हे सगळ्यात मोठे असत्य आहे. देशात गरिबी व बेरोजगाराचा आकडा वाढत आहे. गरीबांना अधिक गरीब बनवून त्यांना रेशनवर फुकट 5-10 किलो धान्यांची भीक घालणे याला मोदीचे सरकार प्रगती आणि विकास मानत आहे. 67 वर्षांत देशातील सर्व सरकारांनी मिळून 55 लाख कोटींचे कर्ज घेतले होते, पण ‘मोदी’ सरकारने मागच्या फक्त सात वर्षातच 85 लाख कोटींचे कर्ज घेतले. या 85 लाख कोटीचा हिशेब मागणान्यांना भ्रष्टाचारी ठरवले जाते.
या 85 लाख कोटीची मलई अदानी यांच्या खिशात मोठ्या प्रमाणावर गेली, अदानी यांची सर्व संपत्ती ही श्री. मोदी यांचीच आहे. अदानी हा फक्त चेहरा आहे. त्यांच्या सर्व संपत्तीचे खरे मालक आपले फकीर’ पतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत, असा आरोप श्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. मोदी व त्याच्या मंडळींचा पैसा अदानी ‘मॅनेज’ करतात व अदानी यांना फक्त 10-20 टक्के कमिशन मिळते, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल पुराव्यासह करतात व ईडी, सीबीआय त्यावर गप्प बसते. न्यायालये स्युमोटो’ पद्धतीने पुढे जात नाहीत अशा विकलांग अवस्थेत माज आपला देश आहे.
श्री. केजरीवाल यांनी अदानी यांनी गिळकृत केलेल्या सर्व कंपन्यांची यादीच जाहीर केली. मुंबईसह सहा विमानतळांचा कारभार अदानी यांना देता यावा यासाठी नियम बदलण्यात आले. सीबीआय आणि ईडीने घाडी घातल्यावर कृष्णापटनम पोर्ट अदानीच्या ताब्यात आले. मुंबईचा विमानतळ जीव्हीके’ कंपनीच्या ताब्यात होता. जीव्हीकेवर ईडी- सीबीआयचा वापर केला व मुंबई विमानतळ अदानीच्या ताब्यात आले. अबुजा सिमेंटचेही तेच झाले. जगभरातील अनेक सौदे व प्रकल्प मोदी यांनी फक्त अदानीच्या खिशात घातले. एका उद्योगपतीच्या पदरात देशाची सर्व संपत्ती घालण्याचे कारण काय ? हा केजरीवाल यांचा प्रश्न. त्या प्रश्नाचे उत्तरही केजरीवाल यांनी दिले. “अदानी फक्त ‘फ्रण्टमैन’ आहेत. त्यांच्या संपत्तीचे खरे मालक मोदी हेच आहेत. भारतीय जनता पक्षाने या भ्रष्टाचाराला व देश लुटण्याच्या पद्धतीला सरळ पाठिबा दिला. हे देशविघातक आहे.
दरम्यान, आपल्या या रोखठोक सदरात संजय राऊतांनी महाभारतातील एक प्रसंगही सांगितला आहे. धर्मराज युधिष्ठिर महाभारतात आपल्या भावांना शोधण्यासाठी वनात गेला असता तळ्याकाठी यक्षानं त्याला प्रश्न विचारल्याच्या प्रसंगात अदाणींचा उल्लेख केला आहे. “धर्मराजाला यक्षानं प्रश्न विचारला, “धर्मराज सांग, अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? पहिल्याच प्रश्नाने धर्मराज गोंधळला. यक्षाकडे त्याने हतबलतेने पाहिले. कोपरापासून नमस्कार केला. “येतो मी” सांगून मागे फिरला व तहानेने व्याकूळ होऊन आपल्या भावांच्या जवळ कोसळला”, असा खोचक टोला संजय राऊतांनी शेवटी लगावला आहे