मिमिक्री वरून राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; आपण मॅच्युअर ….

0
89
Raj Thackeray Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या आपल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नक्कल केली. त्यांनतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. तीही ओरिजनल असा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मिमीक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांची मिमिक्री पाहू. राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. वेगवेगळ्या व्यक्तींचे आवाज काढणे, नक्कल करणे हे आता खूप झाले. यापलिकडे आपण आता मॅच्युअर्ड झाला आहात. थोडं पलिकडे पाहा. संपूर्ण महाराष्ट्र पाहा असा सल्ला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिला.

उद्धव ठाकरेंवर टीका करून किंवा अन्य कुणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच राहुल गांधी यांनी मागील तीन महिन्यात जे कष्ट घेतले आहेत, मेहनत घेतली हे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस तरी एवढी मेहनत घेऊन दाखवावी असे आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता दिले.