हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. या दरम्यान शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडे कितीही उधळू द्या, मात्र जिंकणारआम्हीच आहोत, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी देवेंद्र फडवीसांच्या बुद्धिबळाच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. “बुद्धिबळाचा पट आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि देशी खेळात शिवसेनेसारखा पटाईत पक्षही नाही. आणि सर्वात महत्वाचे शरद पवार हे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सर्व खेळ आमच्याकडे आहेत,” असे राऊत यांनी म्हंटले.
पुण्यातील महमंदवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे उदघाटन आज संजय राऊतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहने हि देशाची गरज आहे. महाविकास आघाडी हणून काम करत असताना तसेच पक्ष वाढवत असताना या राज्यातील स्थ्यर्य आणि एकात्मता सुद्धा टिकवून ठेवली पाहिजे. हनुमान चालीसा आम्हालाही येते. पण लोकांचे प्रश्नही तेवढेच महत्वाचे आहेत. आम्ही राजकारण करत नाही तसेच भोगेही लावत नाही. मात्र, यापुढे आपणही भोगे लावून केलेली कामे सांगणार, असा टोला राऊतांनी राज ठाकरे व भाजपला लगावला आहे.
देशात लढणाऱ्या लोकांना प्रेरणा देण्याचे काम दोन लोकांनी केले. एक महात्मा गांधी व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. गौतम बुद्धांनीही एक संदेश दिला कि अहंकार सोडा. ज्याने अहंकार सईदला तो विजयी झाला. आजही काही लोकांच्या मनात अहंकार आहे. तो दूर केला तर समाजात अनेक गोष्टी सुरळीत होतील.
लढणाऱ्या शिवसैनिकालाच जागा मिळणार
यावेळी संजय राऊत यांनी पुणे महानगर पालिकेत शिवसेनेकडून भगवा फडकवणार असल्याचे सूचक विधान केले. यावेळी ते म्हणाले की, पुण्यात महा विकास आघाडी होईल कि नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीशी सामना करून आपण पुणे महानगर पालिकेवर भगवा फडकवण्याची जिद्द ठेवली पाहिजे. भगवा आणि निळा एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रालाही ताकद दिसेल. पुणे महानगर पालिकेत लढणाऱ्या शिवसैनिकालाच जागा मिळणार, असे राऊत यांनी महानगर पालिकेतील निवडणुकीतील उमेदवारीवरीन स्पष्ट केले.