हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत. दरम्यान या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी करत भाजपवर निशाणा साधला
संजय राऊत म्हणाले, काल सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. वेगळ्या प्रकारे कोंडी करणार होते. पण मराठीत एक म्हण आहे. केले तुका झाले माका, अशी कोकणात म्हण आहे. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते. त्यांच्या हातात बॉम्ब होता. बरं का. पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला.
तालिका समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. विधानसभेच्या इतिहासात अशा प्रकारचं वर्तन झालं नव्हतं असं ते म्हणाले. कालच सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तेच सांगितलं की, आमदार-खासदारांचं सभागृहातील अशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये असेही राऊतांनी म्हंटल.