हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजितदादांसोबत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज आमदार असून त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडी सुरु असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शरद पवारांची भूमिका सांगितली आहे. माझं आत्ताच शरद पवारांशी बोलणं झालं असून आपण खंबीर असल्याचे त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणालेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल ३० आमदार असून त्यातील ९ ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. आत्तापर्यंत अजित पवार यांच्यासोबत हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धर्मराव बाबा आत्राम , दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अदिती तटकरे यांनी शपथ घेतली आहे. शरद पवार यांचा या शपथविधीला पाठिंबा नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झालं आहे. या सर्व घडामोडींनंतर शरद पवार नेमकी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.