हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. कारण ३३ आमदार शिंदे यांच्यासोबत गेले असल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार आहे. या यादरम्यान आता सरकार कोसळण्याबाबत खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे असे ट्विट केले आहे. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असे ट्विट करत राऊतांनी एक प्रकारे सरकार कोसळण्याचे संकेतच दिले आहेत.
आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी आम्ही संघर्ष करू शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. फार फार सत्ता जाईल, मात्र, प्रतिष्ठा सर्वात मोठी असते. पत्याच्या बंगल्याप्रमाणे सरकार कोसळेल असे भाजपला वाटत असेल पण शिवसेनेत सखेतून गरूडझेप घेण्याची ताकद आहे. शिवसेना पाठिमागून वार करत नाही. समोरून शिवसेना निर्णय घेते त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचीच फूस असल्याच्या आरोपात तथ्य नाही. असे म्हंटले होते.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
मात्र, आता महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे दिसत असल्याने राऊत यांनी नुकतेच एक म्हत्वाचाही ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असे म्हणत संकेत दिले आहेत. त्यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.