सामनातून संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!! शिंदेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्यास…..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भाजप युती उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तोडली असा थेट आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मोदींच्या या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक या सदरातून दिले आहे. मोदी 2019 चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ 2014 सालात भाजपने तोडली. त्यानंतर 2019 मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्यास तेव्हा भाजपने नकार दिला म्हणून युती तुटली असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शिवसेना-भाजप युतीचा ‘मित्रकाळ’ 25 वर्षांचा होता व त्या मित्रकाळात मोदी-शहा कोठेच नव्हते. 2014 सालात गुजरातची ही जोडी दिल्लीच्या राजकारणात अवतरली व त्यांनी ‘मित्रकाळ युती तोडली. मोदी 2019 चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ 2014 सालात भाजपने तोडली. विधानसभेच्या एका जागेवरून भाजपने युती तोडली. एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते व युती तोडत आहोत, असे उद्धव ठाकरे यांना अधिकृतपणे सांगण्याची जबाबदारी पक्षाने श्री. खडसेंवर सोपवली. खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘युती तोडत आहोत’ असे सांगितले. श्री. मोदी यांना हे माहीत नसावे? ते कोणाला चुकीची माहिती देत आहेत? 2019 साली दिलेला शब्द पाळला नाही म्हणून दुसरयांदा युती तुटली. एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्यास तेव्हा भाजपने नकार दिला म्हणून युती तुटली. आता त्याच शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केले, मोदी यानी या घडामोडींवर भाष्य केले पाहिजे व खरे बोलायला हवे असं संजय राऊत यांनी म्हंटल.

‘सामना’ माझ्यावर सातत्याने टीका करतो, असा नाराजीचा सूर पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सदनात काढला. तो तितकासा बरोबर नाही. श्री. फडणवीस वगैरे लोक नेहमी सांगतात, “आम्ही ‘सामना’ वाचत नाही.” पण त्यांचे सर्वोच्च बास सामनाची दखल घेतात व त्यावर भाष्य करतात हे चांगल्या नेत्यांचे लक्षण, टीकाकारांचे विचार समजून घेतले पाहिजेत. हीच खरी लोकशाही. मोदी यांच्यावर कधीच व्यक्तिगत किंवा खालच्या पातळीवरची टीका ‘सामना’ने केली नाही. भाजपचे नागडे पोपटलाल शिवसेना नेत्यांवर करतात तसे कमरेखालचे वार व खोटे आरोप केले नाहीत असं संजय राऊत म्हणाले.

नारायण राणेंवर हल्लाबोल –

मोदी मंत्रिमंडळातील महाराष्ट्राचे एक मंत्री नारायण राणे यांनी अविश्वास ठरावाच्या वेळी लोकसभेत केलेले भाषण मोदी यांनी ऐकायला हवे. महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीची लाज घालवणारे ते भाषण सामनाने अशी भाषा कधी वापरली नाही.. धोरणावर टीका करणे हे वेगळे व खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे वेगळे, एकनाथ शिंदेंचे चिरजीव हे उद्धव ठाकरे यांच्या कृपेने दोनदा खासदार झाले त्यांनी संसदेत वापरलेली भाषा ही भाजपच्या नव्या संस्कृतीला शोभणारी आहे असं म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.