“… तर मी राजकारण सोडेन”; पत्रकार परिषदेत संजय राऊतांचे सोमय्यांना आव्हान

SANJAY RAUT
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला भाजपवर निशाणा साधला. आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयाच्या पुढे घेण्याचे नियोजन होते. छत्रपती शिवाजी महाराज याच्या राज्यात बाळासाहेब ठाकरे याच्या राज्यात असे कधी घडले नाही. भाजपने महाराष्ट्रात नालायकपणा सुरु केला. ठाकरे कुटुंबीयांनी अलिबागमध्ये १९ बंगले बांधून ठेवले, असे मुलुंडच्या किरीट सोमय्या या दलालाने म्हंटले. त्या दलाला मी आव्हान करतो कि आपण त्या १९ बंगल्यामध्ये पिकनिक काढू. जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान राऊत यांनी केले.

संजय राऊत यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात खोटेपणाचा कळस चालला आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांच्या नवे रोज १९ बंगले टीव्हीवर दाखवले जात आहेत. मीही उद्धव ठाकरे यांना विचारले कि कुठे आहेत ते बंगले मलाही दाखवा. किरीट सोमय्या कोर्टात मराठी भाषेच्या विरुद्ध गेले. आणि या भडव्याने मुंबईत मराठी कट्टा चालवला आहे.

आज महाराष्ट्रातही नेत्यांना अडकवण्यासाठी केंद्रीय तपासाचा वापर केला जात आहे. मराठी माणसाविषयी भाजपला द्वेष आहे. आमच्यावर आरोप करण्यात आले कि तुम्ही जमिनीत खरेदी केली. पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे घेतली हे दाखवावं बाराव्या माणसाकडून अशी वास्तविक पाटणकर आणि देवस्थानाचा काही संबंध नाही. आम्ही देवस्थानाकडून जमीनी खरेदी केल्या नाहीत, असा खुलासा राऊत यांनी केला.