हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिवसेनेत फूट पडल्यांनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर तुटून पडत आहेत. त्याचाच भाग म्हणजे आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना संपल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) हे पवारांच्या मांडीवर जाऊन दिसतील असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाठ म्हणाले, शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चालवतच नाहीत. ते राष्ट्रवादी चालवत आहे आणि संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. माध्यमांनी ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत हा गैरसमज डोक्यातून काढावा. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि शिवसेना कशी संपेल याची पद्धतशीर मांडणी ते करत आहेत. जेव्हा शिवसेना संपेल, तेव्हा संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील असा टोला संजय शिरसाठ यांनी लगावला आहे.
शिंदेंच्या बंडामागे 'हा' नेता? स्वतःच केला खुलासा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/0EjiJgc4pJ#Hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 25, 2022
दरम्यान, ठाकरे गटाने ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटमध्ये असलेल्या ईएस (EU) कोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे, त्याबाबत विचारल असता तेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टींची चौकशी केली नाही असा उलट सवाल शिरसाठ यांनी केला. एकनाथ शिंदे यांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता. परंतु आता त्यांची सत्ता आहे, त्यांचं काम व्यवस्थित रित्या सुरू आहे असेही ते म्हणाले.