पुण्यातील ससुन रुग्णालयाला ५०० बेड्स मिळणार : अजित पवार

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही. राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी जेवढ्या लसी पाहिजेत तेवढ्या देऊ, असं सांगितलं आहे, तसेच पुण्यातील ससुन रुग्णालयाला ५०० बेड्स देण्यात येतील, असं जावडेकर यांनी आश्वासन दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नसेल, राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असं अजित पवारांनी सांगितलं. तत्पूर्वी पुणे येथे आयोजित बैठकीनंतर पवार मुंबईला निघाले असता त्यांनी हि माहिती दिली. त्यामुळे राज्यासाठी कोणता निर्णय घेतला जाणार याकडे राज्याचं लक्ष आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. मुंबई येथे ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे.