आर्मीत पहिली मुस्लिम युवती : कोळे येथील शकिला शेखचे BSF मध्ये सिलेक्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पदभरतीत कोळे (ता. कराड) येथील शकीला अमिन शेख या विद्यार्थिनीची बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ) येथे निवड झाली. पंजाबमधील एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या शकीला शेख हीची आपल्या जन्मभूमी कोळे येथे जंगी मिरवणूक काढण्यात आली. कोळे गावच्या नावलैकिकात शकिला शेखने एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शकीला शेख ही सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजामधील पहिली महिला बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल होणारी मुलगी आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2018 मध्ये परिक्षा झाली. सन 2019 मध्ये कोरोनोचा प्रादुर्भाव वाढल्याने जानेवारी 2021 मध्ये या परिक्षेचा निकाल लागला. या परिक्षेत कोळे येथील शकीला शेख उत्तीर्ण झाली, त्याच बरोबर मार्च 2021 मध्ये हजर होण्यासाठी पत्रही प्राप्त झाले. त्यानंतर लगेचच रिपोर्टिंगसाठी (ट्रेनिंग) पंजाबला बोलवण्यात आले. 1 एप्रिल 2021 मध्ये पंजाबमध्ये ट्रेनिंगला गेल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण करून 89 बटालियनमध्ये पंजाब येथे पोस्टिंग मिळाले. त्यानंतर पहिल्यांदाच 15 दिवसांच्या सुट्टीवर वर्षभराने शकीला शेख ही आपल्या जन्मभूमी कोळे येथे परतली. मुलगी मुस्लिम समाजातील असली तरी गावच्या नावलाैकिकात तिने एक मानाचा तुरा रोवला गेल्याने सर्वधर्म समभाव अशी ओळख असलेल्या कोळे गावात शकिलाची जंगी मिरवणूक काढण्यात आली. शकीला शेख ही सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजामधील पहिली महिला बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल होणारी विद्यार्थिनी आहे.

शकीला हिचा शपथविधी पंजाबचे राज्यपाल यांच्या उपस्थित खडका कॅम्प पंजाब येथे झाला. तर महाराष्ट्रातून 62 महिला व इतर असे एकूण 451 महिलांचा शपथविधी पार पडला. शकीला शेख याचा योगायोग म्हणजे 23 मार्चला शकीला शेख हिचा वाढदिवस आणि मार्च 2021 मध्येच शकिला हिला कामावार रूजू होण्याचे पत्र प्राप्त झाले व शपथविधी सुद्धा 21 मार्च 2022 ला झाला आहे.

शकीला शेख ही सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिचे वडील आमिन शेख हे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपली मुलगी शकीलाचे बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील अमिन व बंधू आमिर तसेच कुटुंबाचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. प्रथमपासून शकीला हिला देशसेवा करण्याची आवड असल्यामुळे सामान्य परिस्थितीतही बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल होण्यासाठी तिने प्रयत्न केले. तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मनाशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता अपार कष्ट करून रनिंग, फिजिकल, मेडिकल अशा अनेक परीक्षांना सामोरे गेली आणि यशस्वीही झाली. त्या यशस्वीतेच्या जोरावर 89 बटालियन पंजाबमध्ये दाखल झाली आहे.

शकीला शेख ही आज दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता कोळे येथे आल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच ओपन जीपमधून शकीला शेख हिची मिरवणूक संपूर्ण गावामधून काढण्यात आली. तसेच देशभक्तीपरचे गीत वाजवत शकीला शेख यांची गावातून मिरवणूकला सुरुवात झाली. प्रत्येक चौका-चौकांमध्ये महिलांनी व नागरिकांनी शाल श्रीफळ व नारळ शाल देऊन शकीला शेख हिचा सत्कार केला. ग्रामीण भागातील कोळे गावात राहून शकीला शेख हिने मिळवलेले यश हे अभिमानास्पद असून या यशामुळे कोळे गावाचा लौकिक वाढविला आहे.

Leave a Comment