“प्रशासकीय यंत्रणा वसूलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार”; दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय तपास यंत्रणेच्या नावाने प्रशासकीय यंत्रणा वसुलीचे षडयंत्र रचत आहे. याबाबत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची घोषणा केली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी सौरभ त्रिपाठी प्रकरणावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तसेच या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली. त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मान्यता देत केंद्रीय यंत्रणांच्या नावाने प्रशासकीय यंत्रणा वसुलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार असल्याची घोषणा केली.

आज मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी सौरभ त्रिपाठी याच्या प्रकरणाचा मुद्दा उपथित केला. तसेच या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/517056103194626

याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

Leave a Comment