सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणुक लागणार असल्याची शक्यता आहे. ही निवडणुक रंगतदार होणार असल्याची सोशल मिडीयावर आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. उदयनराजें विरोधात सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची सोशल मिडीयावर चर्चा जोर धरू लागली आहे.
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने शरद पवार काय निर्णय घेताहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नुकतीच झालेली लोकसभा निवडणुक उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश न करता जिल्ह्यातील राजकीय वारे ओळखून राष्ट्रवादीमधून लढवली. त्यांच्या विरोधात शिवसेनेतून नरेंद्र पाटील यांनी लढत दिली. या लढतीत 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीएवढे मताधिक्य उदयनराजेंना मिळाले नाही ते 1.26 लाखाच्या मताधिक्क्याने विजयी झाले. कमी मतांनी निवडून आल्याने त्यांनी अंगावर गुलालही घेतला नव्हता.
[youtube https://www.youtube.com/watch?v=fnU1IHkp9iY&w=560&h=315]
महाराष्ट्रामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये दिग्गजांचे प्रवेश सुरू आहेत. यातच उदयनराजेंच्या नावाची गेल्या महिन्याभरापासून जोरदार चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी शनिवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक लागणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे श्रीनिवास पाटील हे कराड लोकसभा मतदार संघातून दोन वेळा खासदार झाले आहेत. तसेच ते सिक्कीमचे राज्यपालही होते. सातारा लोकसभा मतदार संघातील कराड, पाटण, कोरेगाव, जावली, सातारा तालुक्यात त्यांचा मोठा संपर्क असून मतदार संघावर चांगली पकड आहे. यामुळे श्रीनिवास पाटीलच हे उदयनराजे यांच्या विरोधात लढतील, अशी चर्चा सोशल मिडीयावर जोर धरू लागली आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल
EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश
तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…
पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?
कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर
शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम