हसन मुश्रीफ भाजपला पुरून उरतील, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी- सतेज पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. दरम्यान, या याबाबत कोल्हापूरचेच काँग्रेस नेते सतेज पाटील यांना विचारले असता त्यांनी हसन मुश्रीफांची पाठराखण केली. तसेच मुश्रीफ भाजपला पुरून उरतील असा विश्वास देखील व्यक्त केला.

हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या नेत्याला विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण आजपर्यंत अनेक संकटे ताकदीने परतवणारे मुश्रीफ हे या संकटावर तितक्याच ताकदीने मात करतील व भाजपला पुरून उरतील असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, मुश्रीफ त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांचे मन निश्चितपणे व्यथित होऊ शकते. पण सर्वसामान्य लोकांचा नेता असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या पाठिशी आम्ही सर्वजण तखंबीरपणे उभे आहोत.