सांगली शहरात दहशत माजवणारी सातपुते आणि जाधव टोळी तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दमदाटी, मारहाण यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गणेश सातपुते आणि ओंकार जाधव टोळीस दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सातपुते टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग यांसह ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत तर ओंकार जाधव टोळीवर देखील ०९ गुन्हे दाखल आहेत.

या टोळींना तडीपार करण्याचा प्रस्ताव सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी अधीक्षकांकडे दिला होता. प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दोनही टोळीतील १८ जणांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून तडीपार केले. मोठ्या प्रमाणात टोळीतील गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी तडीपार केल्याने खळबळ उडाली आहे.

सातपुते टोळीतील प्रमुख गणेश बाबासो सातपुते ( वय ३३), रोहित बाबासो सातपुते (वय ३२), हैदरअली हुमायुन पठाण (वय ३०), जाफर हुमावून पठाण (वय २९), गणेश सुरेश मोरे (वय २६), निखील सुनिल गाडे (वय ३९) राहुल सावंता माने (वय २९ सर्व रा. रमामातानगर) तर ओंकार जाधव टोळीतील टोळी प्रमुख ओंकार सुकुमार जाधव (वय २९), शुभम कुमार शिकलगार (वय २३) सुज्योत ऊर्फ बापू सुनिल कांबळे (वय २३), आकाश ऊर्फ अक्षय विष्णू जाधव (वय २४) अमन अकबर शेख (वय २०), कृपेश घनःश्याम चव्हाण (वय २९), ऋषिकेश दुर्गादास कांबळे (वय २१), साहिल हुसेन शेख (वय २२), राहुल रमेश नामदेव (वय २९) प्रेमानंद इराप्या अलगंडी (वय ३१) गणेश चत्राप्या बोबलादी (वय २४ सर्व रा. १०० फुटी रोड, गणेशनगर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

Leave a Comment