सत्यशील शेरकर यांनी बंदूक दाखवून माती चाटायला लावली; तरुणाचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना माझे काम बोचत असून ते बंद करण्यासाठी यांनी मला बंगल्यावर बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे मनोरुग्णांसाठी संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या अक्षय मोहन बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काहीतरी चांगले काम करता यावे म्हणून मी गेली ३ वर्षे कुटुंबासोबत समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो आहे. हे काम बंद करावे म्हणून सत्यशील शेरकर यांनी मला घरी बोलावले. बंदूक ताणून माफी मागायला सांगितली, माती चाटायला सांगितली.” असा आरोप या तरुणाने केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी शरीरावर झालेली मारहाण दाखविली आहे. मी कुणाकडे तक्रार करण्यास जाणार नाही कारण पैशाच्या जोरावर त्यांनी सर्वाना विकत घेतले आहे. आणि मला न्याय मिळणार नाही हे मला माहित आहे असेही त्यांनी म्हंटले आहे.

तरुणाच्या या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले आहे की, ” बंदुकीचा धाक दाखवून मला ज्या गोष्टी करायला लावल्या आणि त्याचा व्हिडीओ केला आहे, आणि जर मी काही आगाऊ कृती केली तर मारून टाकण्याची धमकी दिली आहे.” या व्हिडिओमध्ये या तरुणाने सत्यशील शेरकर यांनी याआधी खूप लोकांना मारहाण केली असून काहींना जीवे मारल्याचाही आरोप केला आहे. त्याने सर्व माहितीसाठी त्याचा स्वतःचा आणि सत्यशील शेरकर यांचाही मोबाईल नंबर शेअर केला आहे. त्यांना शिरोली गावाम्हणणे चा आमदार व्हायचे आहे. त्यासाठी ते सर्व काही करत आहेत. असे या तरुणाचे म्हणणे आहे. माझे काम मी बंद केले आणि वाईट मार्गाला लागलो तर त्याला तेच जबाबदार असतील असे तरुणाने म्हण्टले आहे.

बोऱ्हाडे यांनी मंचरहून एक मनोरुग्ण आणला होता अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली होती. संस्थेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास गावाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून केवळ त्याला समज देण्यासाठी घरी बोलावले होते. पण काहीच समजून न घेता तो अरेरावीची उत्तरे देत निघून गेला आणि मारहाण केल्याचे लाईव्ह केले. असे म्हणत शेरकर यांनी हे आरोप नाकारले आहेत. या व्हिडिओमध्ये हे रुग्णाचे पण एक राजकारण आहे आणि पुढे जाऊन ते वापरणार हे मला माहित आहे. असे बोऱ्हाडे म्हणाले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून विविध माध्यमातून मला त्रास दिला जात आहे. मात्र आज त्याचे टोक गाठण्यात आले असे अक्षय बोऱ्हाडे यांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment