व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गरिबांना प्रत्येकी १७ हजार ५०० रु द्या; अशोक चव्हाणांची रुग्णालयातून मागणी

मुंबई |  काँग्रेस पक्षाने मजूर तसेच गरीब यांच्या व्यथा मांडण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारला घेरण्याचा क्रम सरकारने सुरु केला आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेसमधील नेत्यांनी व्हिडिओद्वारे आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाला बाली पडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनीदेखील या मोहिमेत रुग्णालयातूनच सहभाग घेतला आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाने उपाययोजनांसाठी जो मार्ग काढला आहे त्यामध्ये माझाही सहभाग असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यांनी केंद्र सरकारला गरिबांना प्रत्येकी १७ हजार ५०० रु द्या अशी मागणी केली आहे.

मुंबईच्या एका रुग्णालयात चव्हाण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. सध्या देशात सुरु असलेल्या साथीच्या आजारामुळे देशातील गरीब जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. मात्र केंद्र सरकारकडून भरीव मदत आली नसल्यामुळे, जनतेत निराशेचे वातावरण आहे. यासाठीच देशाची अर्थव्यवस्था लवकर सुधारावी म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी गरीब कुटुंबांच्या बँक खात्यात एकरकमी १० हजार रुपये जमा करण्याची तसेच काँग्रेस पक्षाच्या ‘न्याय’ योजनेनुसार पुढील सहा महिने दरमहा ७ हजार ५००रु द्यावेत अशी मागणी केली आहे. या मागणीला चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.

 

सर्वात जास्त नुकसान हे गरीब, कामगार तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योजकांचे झाले असून या काळात त्यांना मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. सरकारने यासाठी जी कर्ज योजना जाहीर केली आहे त्यासोबतच जर नागरिकांना रोख आर्थिक मदत केली गेली तर त्यांना दिलासा मिळेल असे ते म्हणाले. त्याचबरोबर लोकांच्या हातात पैसा उपलब्ध असेल तर बाजारातील मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होण्यास मदत होईल. यासोबतच परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी त्यांचा प्रवासखर्च सरकारने करून त्यांना २०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. व्हिडिओतील त्यांच्या आवजावरून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.