हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। विविध आकर्षक फायद्यांमुळे हल्ली क्रेडिट कार्ड खूप लोकप्रिय झाले आहे. क्रेडिट कार्ड मुळे तरुणांना आर्थिक स्वातंत्र्याची अनुभूती तसेच आपल्या ईच्छा पूर्ण करण्याची ताकद मिळते आहे. मात्र यासोबत क्रेडिट कार्ड ही एक जबाबदारी देखील असते. म्हणूनच आपल्या मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी काही गोष्टी सांगणे खूप गरजेचे असते. क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरल्यास अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच १८ वर्षाखालील मुलांना क्रेडिट कार्ड दिले जात नाही. अशावेळी आई-वडील मुलांना प्रायमरी क्रेडिट कार्ड शकतात.
ऍड-ऑन क्रेडिट कार्ड सोबत प्रायमरी क्रेडिट कार्डची मर्यादा सांगितली जाते. त्यामुळे मुलांना काय मर्यादा आहे याची माहिती तसेच कार्डच्या माध्यमातून होणारा खर्च किती झाला पाहिजे याचीही माहिती दिली पाहिजे. आपल्या या एकत्रित कार्डचे बिल तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या ३०% पेक्षा कमी झालेले केव्हाही चांगले असते कारण प्रायमरी कार्ड धारकाचा क्रेडिट स्कोर चांगला होण्यास मदत होते. तुम्ही देखील आपल्या ऍड-ऑन कार्डला मर्यादा घालू शकता यामुळे वायफळ खर्चालाही आळा बसू शकतो. मुलांना क्रेडिट कार्ड स्टेटमेंट कसे वाचावे हे देखील सांगावे म्हणजे त्यांना बिल जनरेशन तारीख आणि त्याची अंतिम मुदत काय असते याची माहिती होईल तसेच ते वेळेत भरणे का गरजेचे आहे हे देखील समजेल. कमीतकमी रकमेची अंतिम मुदतीला भरणा केला तर खाते सुरु राहण्यास आणि उशिरा पैसे देण्यापासून बचाव कोण्यास मदत होते.
क्रेडिट कार्डच्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षेवर लक्ष नाही दिले तर सगळे पैसे खात्यातून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षित पद्दतीने क्रेडिट कार्ड कसे वापरावे याची माहिती मुलांना दिली पाहिजे. कार्डचा पिन, सीव्हीव्ही क्रमांक गोपनीय ठेवण्यास आणि नियमित पणे पिन अपडेट करण्यास सांगितले पाहिजे. सोबतच त्यांना ऑनलाईन अकॉउंट सुरक्षित ठेवण्याची माहिती दिली पाहिजे. याबरोबरच कोणकोणत्या पद्धतीने क्रेडिट कार्ड धारकांना फसविले जाऊ शकते ज्यामध्ये कार्ड क्लोनिंग, स्किमिंग यांचा समावेश असतो, याचीही माहिती दिली पाहिजे.
वेळेवर बिल न भरल्यास व्याजासहित क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोरवर देखील परिणाम होऊ शकतो हे देखील लक्षात आणून देणे आवश्यक आहे. कार्ड शी संबंधित सर्व पेमेंट्स ची जबाबदारी प्रायमरी कार्ड धारकांची असते. म्हणून पेमेंट प्रक्रिया, दंडाची रक्कम आणि वेळेत पेमेंट न केल्यास होणाऱ्या परिणामांची माहिती सांगणे गरजेचे आहे. एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरले जात असेल तर कार्डच्या कंपन्या अधिक व्याज आकारतात. रोख रक्कम काढण्याची सुविधा ऍड-ऑन कार्ड धारकांनाही दिली जाते. त्यामुळे मुले कार्ड वापरण्यास सुरुवात करण्याआधी त्यांना याच्याशी संबंधित माहिती दिली पाहिजे. याच्याशिवाय रोख रक्कम काढल्याच्या दिवसापासून व्याज सुरु होते. आर्थिक संकटाच्या वेळी अगदी काहीच पर्याय उरला नाही तरच रोख रक्कम काढण्याचा विचार करावा असेही सुचवावे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.