हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. बदलत्या काळानुसार SBI कडून आपल्या खातेदारांना विविध सुविधा दिल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांत एसबीआयच्या योनो मोबाइल बँकिंग एपचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्याच्या अनेक ग्राहक घर बसल्या मोबाईल एपद्वारे बँकेचे खाते उघडत आहेत. अशा परिस्थितीत जर योनो खाते बंद झाले तर SBI च्या ग्राहकांना मोठ्या त्रास सहन करावा लागू शकतो.
मात्र अशातच आता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते आहे, ज्यामध्ये एसबीआय खातेधारकांनी आपल्या योनो खात्यामध्ये पॅन क्रमांक अपडेट केला नाही, तर हे योनो खाते ब्लॉक केले जाईल,असा दावा केला जातो आहे. यासोबतच एक लिंकही पाठवली जात आहे, ज्यावर क्लिक करून आपले पॅन कार्ड काही मिनिटांत अपडेट करता येईल, असे सांगण्यात येते होते. जर आपल्यालाही असा कोणताही मेसेज आला असेल तर या व्हायरल मेसेज मागची सत्यता जाणून घ्या.
A #Fake message impersonating @TheOfficialSBI claims that the recipient's YONO account has been blocked#PIBFactCheck
▶️Never respond to emails/SMS asking to share your banking details
▶️If you have received any similar message, report immediately on [email protected] pic.twitter.com/PM7MdrWiCg
— PIB Fact Check (@PIBFactCheck) February 14, 2023
PIB ने सांगितले कि –
आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देताना PIB ट्विट केले आहे की, एसबीआयच्या नावाने व्हायरल होत असलेला हा दावा पूर्णपणे खोटा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना योनो खाते अपडेट करण्याची लिंक मेसेजद्वारे पाठवली जात नाही. जर कोणी आपल्याला असा मेसेज किंवा ईमेल पाठवला असेल तर त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. अशाप्रकारे लिंकवर क्लिक करून माहिती शेअर केल्याने आपण सायबर फसवणुकीला बळी पडू शकाल.
एसबीआय ग्राहकांना वेळोवेळी सावध करते
हे जाणून घ्या कि, एसबीआय कडून आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सायबर गुन्ह्यांची माहिती देत असते. बँकेच्या म्हणण्यानुसार, जर कोणी आपल्याला कॉल किंवा मेसेज करून आपले वैयक्तिक तपशील जसे की मोबाइल नंबर, आधार क्रमांक, पॅन कार्ड नंबर, क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर इत्यादींची माहिती विचारत असेल, तर हे तपशील त्याच्यासोबत अजिबात शेअर करू नका. यासोबतच कोणत्याही प्रकारचा OTP वगैरे सांगणे टाळा. असे केल्याने आपण सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहू शकाल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sbiyono.sbi/app/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ