हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात शेतकऱ्यांना बऱ्याचदा कर्जाची आवश्यकता भासू शकते, म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि काही बँका शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असतात. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय केसीसी अंतर्गत शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज देते. ज्यावर केवळ ४% व्याज घेतले जाते.
किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत अत्यंत सोप्या अटींमध्ये एसबीआय शेतकऱ्यांना कर्ज देते. याद्वारे कर्ज कसे काढायचे याबाबत एसबीआय च्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत स्वतःची जमीन असणारे आणि संयुक्तिक शेती करणारे शेतकरी देखील हे कर्ज घेऊ शकतात. पीएम किसान योजनेशी संबंधित माहिती सरकारकडे पूर्वीच उपलब्ध असल्यामुळे कर्ज देणे सोपे होते. १ हेक्टर जमिनीवर २ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. प्रत्येक बँकेची कर्जमर्यादा वेगवेगळी असते.
शेतीसाठी केसीसी वर घेतल्या जाणाऱ्या तीन लाख रुपयांच्या कर्जावर ९% व्याज असते. मात्र २% ची सबसिडी सरकार देते. याप्रकारे हे व्याज ७% पडते. पण वेळेवर परत केल्यास यातही ३% सूट मिळते. अशाप्रकारे जागरूक शेतकऱ्यांसाठी व्याज केवळ ४% राहते. कर्जासाठी बँक किसान क्रेडिट कार्ड जारी करते. ज्याद्वारे आपण केव्हाही पैसे काढू शकता. कोणत्याही को ऑपरेटिव्ह तसेच क्षेत्रीय ग्रामीण बँकेतून हे कर्ज मिळविता येते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रुपे केसीसी जारी करते. एसबीआय, बीओआय आणि आयडीबीआय बँकेतूनही हे कार्ड काढले जाऊ शकते.
हे पण वाचा –
शेतकर्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत येथे करा नोंदणी
शेतकऱ्यांनसाठी खूषखबर! कर्जफेडीसाठी मिळाला आगस्टपर्यंतचा वाढीव कालावधी
फक्त ‘हे’ ३ कागदपत्र जमा केल्यावर घरी परतलेल्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार ६ हजार रुपये
८ करोड शेतकर्यांना सरकारचा दिलासा; खात्यात २ हजार जमा! तुमवे नाव आहे का इथे पहा
शेतकर्यांसाठी सरकारची नवी सुविधा, ‘हा’ फोन नंबर करणार लाॅकडाउनमध्ये शेती समस्यांचे निराकरण