गुड न्यूज! मोदी सरकारकडून मोफत मिळेल गॅस सिलिंडर, आधी करावे लागेल ‘हे’ काम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब कुटुंबासाठी राबविलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांनी अद्याप तिसरे सिलिंडर घेतले नाही आहे ते सप्टेंबर पर्यंत मोफत सिंलिंडर घेऊ शकतात. अशात जर तुम्ही गरीब कुटुंबातले असाल आणि या योजनेचा लाभ घेतला नसेल तर यासाठी अर्ज करू शकता. याची नोंदणी करणे अगदी सोपे आहे. या गॅस कनेक्शन साठी BPL परिवारातील कोणतीही महिला अर्ज करू शकते.  एका तरतुदीअंतर्गत जेव्हा तुम्ही गॅस स्टोव्ह कनेक्शन घेता तेव्हा गॅस स्टोव्हसह एकूण किंमत ३२०० रुपये असते. यात सरकारकडून १६०० रु अनुदान दिले जाते. आणि उर्वरित १६०० रु तेल कंपन्या देतात. मात्र आता ग्राहकांना ही रक्कम ईएमायच्या स्वरूपात तेल कंपन्यांना द्यावी लागणार आहे.

पूर्वी सरकारकडून पैसे दिले जात होते मात्र आता ग्राहकांना आधी पैसे भरावे लागतील तसेच नंतर सरकार आपल्या खात्यावर सबसिडी जमा करेल म्हणजे सिलिंडर मोफतच मिळेल. बरेच लाभार्थी मिळणाऱ्या पैशाचा वापर सिलिंडर खरेदीसाठी न करता इतर कामांसाठी करतात म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने आधी पैसे जमा करण्याची आणि मग सबसिडी देण्याचा नियम लागू केला आहे. ही योजना १ मे २०१६ रोजी सुरु करण्यात आली होती. www.pmujjwalayojana.com या वेबसाईटवर जाऊन या योजनेची सर्व माहिती घेता येऊ शकते.

या कनेक्शन साठी एक अर्ज भरून जवळच्या एलपीजी वितरकाकडे द्यायचा आहे. अर्जासोबतच्या पत्रात महिलेला आपला पूर्ण पत्ता, जनधन बँक खाते आणि परिवारातील सदस्यांचा आधार नंबर द्यायचा आहे. या मागणीची प्रक्रिया केल्यावर देशातील तेल कंपन्या योग्य लाभार्थ्याला एलपीजी कनेक्शन जारी करतात. जर कुणी हप्त्याचा पर्याय निवडला तर हप्त्याची रक्कम सबसिडीवर ऍडजस्ट केली जाते. उज्जवला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन साठी स्टोव्ह सहित ३२००रु किंमत असते. यातील १६००रुपयांची सबसिडी थेट सरकारकडून दिली जाते. बाकीची रक्कम तें कंपन्या देतात. मात्र ग्राहकांना हप्त्यांच्या रूपात १६००रु तेल कंपन्यांना द्यावे लागतात.

हे पण वाचा –

लाॅकडाऊनमध्ये तुम्हीपण घेऊ शकता मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा; मिळेल ३.७५ लाखांची मदत

Atal Pension Yojana | सरकारने शिथिल केले नियम, आता २.२८ लोकांना मिळेल अधिक फायदा 

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! ‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत येथे करा नोंदणी

८ करोड शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा; खात्यात २ हजार जमा! तुमवे नाव आहे का इथे पहा

पंतप्रधान जनधन योजनेचे अनेक फायदे; फ्रि मध्ये मिळतो इन्श्युरन्स मात्र करावे लागेल ‘हे’ काम