नवी दिल्ली । ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता अनेक संस्था वेळोवेळी आपल्या युझर्सना सतर्क करत असतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीबद्दल सतर्क केले आहे. बँकिंग फसवणुकीची बहुतांश प्रकरणे KYC शी संबंधित आहेत. त्यामुळे SBI ने कोणत्याही फोन कॉलवर किंवा SMS द्वारे KYC टाळण्याचा सल्ला दिला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना KYC फसवणुकीबाबत सतर्क केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना SMS द्वारे पाठवलेल्या एम्बेडेड लिंकवर क्लिक न करण्यास सांगितले आहे. ते बनावट असू शकते आणि त्यामुळे तुमच्या बँक खात्याचे सर्व डिटेल्स चोरीला जाऊ शकतात.
SBI ने म्हटले आहे की,फसवणूक करणारी लोकं ग्राहकांना असे SMS पाठवतात – प्रिय ग्राहक, तुमची SBI डॉक्युमेंट्स एक्सपायरी झाले आहेत. तुमचे खाते 24 तासांच्या आत ब्लॉक केले जाईल. तुमचे KYC अपलोड करण्यासाठी कृपया http://ibit.ly/oMwK या लिंकवर क्लिक करा.
बँक अलर्ट
SBI ने म्हटले आहे की,”बँक तुम्हाला SMS मध्ये एम्बेड केलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचे KYC अपडेट/पूर्ण करण्यास सांगणार नाही. अलर्ट रहा आणि SBI सह सुरक्षित रहा.
SBI ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका ट्विट मेसेजमध्ये म्हटले आहे की, अशा SMS वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा बँक बॅलन्स झिरो होऊ शकते. SBI च्या नावाने कोणताही मेसेज आल्यावर बँकेचा शॉर्ट कोड बरोबर आहे की नाही ते तपासा. SBI ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हे #YehWrongNumberHai, KYC फसवणुकीचे उदाहरण आहे. अशा SMS मुळे फसवणूक होऊ शकते आणि तुम्ही तुमची सेव्हिंग्स देखील गमावू शकता. एम्बेड केलेल्या लिंकवर क्लिक करू नका. SMS मिळाल्यावर, SBI चा योग्य शॉर्ट कोड तपासा. अलर्ट रहा आणि #SafeWithSBI वर रहा.
बँकेने असे म्हटले आहे की, ते कधीही आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या एम्बेडेड लिंकवर SMS द्वारे KYC अपडेट करण्यास सांगत नाही.
प्रलोभन से बचें, साइबर धोखाधड़ी से सावधान रहें और साइबर सुरक्षित रहें। हेल्पलाइन नंबर 1930 ( पूर्व में 155260) पर सहायता प्राप्त करें। #cyberdost pic.twitter.com/JNhHNt2irV
— Cyber Dost (@Cyberdost) February 27, 2022
Cyber Dost ने ही अलर्ट केले
सायबर क्राईमच्या घटनांना आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाने Cyber Dost (@Cyberdost) नावाचे ट्विटर हँडल तयार केले आहे. Cyber Dost वेळोवेळी लोकांना सतर्क करत असतो. या वेळी Cyber Dost सांगतो की,” सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या मोबाईल फोन चार्जिंग स्टेशनवर कधीही तुमचा मोबाईल चार्ज करू नका. सायबर हॅकर्स तुमच्या फोनवरून वैयक्तिक माहिती चोरू शकतात किंवा या चार्जिंग स्टेशनवर कोणतेही मालवेअर इन्स्टॉल करू शकतात.”
सायबर क्राईमशी संबंधित तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर 1930 देखील जारी करण्यात आला आहे. येथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. पूर्वी ही संख्या 155260 होती जी आता 1930 करण्यात आली आहे.