हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असलेल्या लोकांसाठी ही बातमी फार महत्वाची आहे. कारण दिवाळीपूर्वी एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का बसला आहे. आता कंपनीकडून जाहीर करण्यात आले की, ते क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या भाड्याच्या पेमेंटवर प्रोसेसिंग फीस आकारणार आहेत. ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या एसएमएसनुसार, आता कंपनी क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या भाड्याच्या पेमेंटवर 99 रुपये जास्त जीएसटी आकारेल. 15 नोव्हेंबर 2022 पासून हे नियम लागू होतील, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
याशिवाय SBI कार्ड्सने मर्चंट EMI ट्रान्सझॅक्शन वरील प्रोसेसिंग फीस देखील बदलली आहे. जे 99 रुपयांवरून 199 रुपये केले गेले आहे. अशा ट्रान्सझॅक्शनवर आता 18% दराने GST देखील आकारला जाईल.
15 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार नियम
लोकांना पाठवण्यात आलेल्या एसएमएसमध्ये सांगितले कि- “Dear Cardholder, charges on your credit card shall be revised/levied w.e.f 15 Nov’22.” For more information, the customers are requested to visit the company’s website.”
थर्ड पार्टी ऍप्सद्वारे रेंट पेमेंट
लोकं सहसा Paytm, Freecharge, Mobikwik, Cred, RedGiraffe, MyGet, Magicbricks सारख्या थर्ड पार्टी ऍप्सच्या साहाय्याने क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट करतात. अशा थर्ड पार्टी ऍप्सकडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी सर्व्हिस चार्ज आकारला जातो.
ICICI ने देखील वाढवले शुल्क
गेल्या महिन्यात, ICICI बँकेने जाहीर केले की क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या भाड्याच्या पेमेंटवर 1% प्रोसेसिंग फीस आकारली जाईल. 20 ऑक्टोबर 2022 पासून प्रोसेसिंग फीस आकारली जाईल. ICICI बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये म्हटले कि, “प्रिय ग्राहक, 20-10-2022 पासून, ICICI बँक क्रेडिट कार्डवरील भाड्याच्या पेमेंटवरील सर्व ट्रान्सझॅक्शनवर 1% शुल्क आकारले जाईल.”
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.sbicard.com/
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त