हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI कडून ग्राहकांसाठी अनेक ऑफर लाँच केल्या जातात. बँकेकडून त्याबाबतची माहिती थेट SMS द्वारे दिली जाते. हे लक्षात घ्या कि, सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एसबीआय कडून वर्धापन दिनानिमित्त 6 हजार रुपये जिंकण्याची संधी दिली जात आहे, असा दावा करण्यात आला आहे. अनेक युझर्सनी या व्हायरल मेसेजबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
SBI ने दिला सावधगिरीचा इशारा
आता एसबीआय ने देखील लोकांना या व्हायरल मेसेज बाबत सावध करण्यासाठी ट्विट केले आहे. तसेच अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहावे आणि सबसिडी, फ्री ऑफर, फ्री गिफ्ट यासारखे मेसेज आल्यास त्याला रिप्लाय देण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, असे बँकेने म्हटले आहे. सायबर गुन्हेगारांकडून अशा प्रकारच्या ऑफर्स देऊन ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे देखील बँकेने म्हटले आहे.
अशा प्रकारे केली जाते फसवणूक
एसबीआय ने म्हंटले कि, ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी सोशल मीडियावर सध्या एक मेसेज प्रसारित केला जात आहे, ज्यामध्ये 67 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात एसबीआय कडून 6 हजार रुपये जिंकण्याची संधी, असे म्हटले जात आहे. मात्र यासाठी ग्राहकांना चार सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, त्यानंतर रुपये जिंकल्याच्या शुभेच्छा पाठविल्या जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 6 हजार रुपये मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही वैयक्तिक माहिती मागितली जाते. जेव्हा ग्राहकाकडून लोभापोटी आपली माहिती गुंडांना दिली जाते तेव्हा त्याचे खाते रिकामे केले जाते.
Beware of subsidies and free offers promised by fraudsters to dupe you. Stay alert and #BeSafeWithSBI.#CyberCriminals #Fraudsters #OnlineFraud pic.twitter.com/OoWN4urDYz
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 28, 2022
हे लक्षात घ्या कि, याआधी SBI च्या ग्राहकांना त्यांचे पॅन अपडेट करण्यास सांगून फसवणूक केली जात होती, ज्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून एक बनावट लिंक देखील बनवण्यात आली होती. मात्र, याबाबत सरकारने स्पष्टीकरण देताना असा कोणताही मेसेज बँकेकडून पाठवला जात नसल्याचे सांगत ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले आहे. जर कोणाला असा मेसेज आला तर [email protected] वर तक्रार करू शकता.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.sbi/
हे पण वाचा :
शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!
सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन !!!
Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!