हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून आपल्या होम लोन वरील किमान व्याजदरात वाढ करण्यात आले आहे. 15 जूनपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. SBI ने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्येही 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. हे लक्षात घ्या कि, RBI ने आपल्या रेपो दरात नुकतेच 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे, ज्यानंतर SBI ने हे पाऊल उचलले आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, आता बँकेच्या होम लोन वरील किमान व्याजदर 7.55 टक्के करण्यात आला आहे. तसेच ज्यालोकांचा CIBIL स्कोअर हा 800 पेक्षा जास्त आहे अशा लोकांनाच 7.55 टक्के दराने होम लोन दिले जाईल. मात्र ज्या लोकांचा CIBIL स्कोर 750-799 आहे त्यांना वार्षिक 7.65% दराने होम लोन मिळेल. त्याचप्रमाणे, CIBIL चा 700-749 असलेल्यांना 7.75 टक्के आणि 650-699 स्कोअर असलेल्यांना 7.85 टक्के दराने होम लोन मिळेल. तसेच 550-649 दरम्यान CIBIL स्कोअर असलेल्या लोकांना होम लोनसाठी 8.05 दराने व्याज द्यावे लागेल. इथे हे लक्षात घ्या कि, हे फ्लोटिंग व्याजदर आहेत आणि ते रेपोशी लिंक्ड असतात.
MCLR देखील वाढला
बँकेकडून एक वर्षाचा बेंचमार्क असलेला MCLR देखील 7.20 टक्क्यांवरून 7.40 टक्के वाढवण्यात आला आहे. ऑटो, होम आणि पर्सनल लोनसारखी सर्व कर्जे MCLR शी जोडलेली असतात. त्यामुळे रेपो दरात बदल झाल्यास त्यामध्येही बदल होतो. 15 जूनपासून SBI कडून रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) देखील वाढवण्यात आला आहे. याआधी RLLR 6.65 टक्के होता जो आता 7.15 टक्के करण्यात आला आहे. बँकेकडून 15 जूनपासून हे वाढलेले दर लागू करण्यात आले आहेत.
FD वरील व्याज दरातही वाढ
14 जून रोजीच SBI कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 211 दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात बदल केला होता. बँकेने 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 4.40 टक्क्यांवरून 4.60 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. तसेच एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ग्राहकांना वार्षिक 5.30 टक्के व्याज मिळेल. त्याबरोबरच बँक आता दोन ते तीन वर्षाच्या FD वर 5.35 टक्के व्याज देत आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/home-loans-interest-rates-current
हे पण वाचा :
Bank FD Rates : ‘या’ मोठ्या बँकांकडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवे दर पहा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या !!!
Kisan Vikas Patra : ‘या’ सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट पैसे !!!
‘या’ 8 मार्गांनी Social Media वर स्वतःला ठेवा सुरक्षित !!!
Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा