SBI Home Loan : SBI देत आहे स्वस्त दरात होम लोन, प्रक्रिया शुल्क देखील केले माफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Home Loan : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर आता बँकांकडून होम लोन घेणे महागले आहे. अशा परिस्थितीत जर आपल्याला कमी दरात होम लोन देणाऱ्या बँकांविषयी माहिती हवी असेल तर आजची आपली ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. हे जाणून घ्या कि, सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्यासाठी स्वस्त होम लोन ऑफर आणली आहे. SBI च्या या नवीन ऑफरचे नाव Campaign Rates असे आहे.

SBI hikes MCLR by 10 bps; concessions on home loan rates to end 31 Jan |  Mint

SBI कडून ग्राहकांना या ऑफर अंतर्गत, होम लोनवरील व्याज दरांवर 30 ते 40 बेसिस पॉइंट्सची (0.30 ते 0.40 टक्के) सूट दिली जाते आहे. 31 मार्च 2023 पर्यंत ही ऑफर व्हॅलिड असेल. या नवीन ऑफर अंतर्गत, बँकेच्या ग्राहकांना नियमित होम लोनवर 8.60 टक्के व्याजदर मिळत आहे.यासोबतच SBI ने नियमित आणि टॉप-अप होम लोनवरील प्रोसेसिंग फीस देखील माफ केली आहे. हे लक्षात घ्या की, SBI चे होम लोनवरील व्याज दर क्रेडिट स्कोअरच्या आधारावर बदलत असतात. SBI Home Loan

How to choose a suitable home loan provider | Mint

नियमित होम लोनवर मिळेल 30 ते 40 बेसिस पॉइंट्सची सूट

>>SBI नियमित होम लोनवर 30 ते 40 बेसिस पॉइंट्सची सूट दिली जाते आहे. मात्र, ही सवलत 700 ते 800 किंवा त्याहून जास्त क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांनाच दिली जाईल. SBI च्या कॅम्पेन रेट ऑफर अंतर्गत होम लोनवरील व्याज दर 8.60 टक्के आहे.
>> 800 पेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना 8.90 टक्के सामान्य दराने 30 बेसिस पॉइंट्सची सूट दिली जात आहे.
>> तसेच 750-799 क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना 9 टक्क्यांऐवजी 8.60 टक्के व्याजदराने होम लोन मिळेल.
>> त्याच प्रमाणे 700-749 क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना 9.10% ऐवजी 8.70% व्याजदराने होम लोन मिळेल. SBI Home Loan

5 Things to Keep in Mind While Applying for a Home Loan

महिला आणि पगार खातेदारांसाठी 5 बेसिस पॉइंट्सची अतिरिक्त सूट

याशिवाय महिलांना 5 बेसिस पॉइंट्सची अतिरिक्त सूट मिळेल. पगार खातेधारकांना विशेषाधिकार आणि आपन घर योजनांतर्गत 5 बेसिस पॉइंट्सची अतिरिक्त सूट मिळेल. SBI Home Loan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/home-loans-interest-rates-current

हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???