हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारी बँक असलेल्या SBI कडूनही आता इलेक्ट्रॉनिक बँक गॅरेंटी जारी केली जाणार आहे. नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड (NeSL) बरोबर भागीदारीत SBI ई-बँक गॅरेंटी जारी करेल. तसेच नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेडच्या पोर्टलवर ही इलेक्ट्रॉनिक बँक गॅरेंटी जारी केली जाईल. याद्वारे तो ग्राहकांना वेगवान आणि पेपरलेस सर्व्हिस मिळणार आहे. ज्यामुळे बँक गॅरेंटीसाठी लागणारा वेळ खूप कमी होईल.
हे जाणून घ्या कि, भारतात पहिल्यांदा HDFC बँकेकडून 4 सप्टेंबर पासून इलेक्ट्रॉनिक बँक गॅरेंटी जारी करायला सुरूवात झाली. इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी हे गॅरंटीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कागदपत्रे द्यावी लागत नाही. यामुळे बँकेच्या गॅरेंटीची संपूर्ण प्रक्रिया अगदी सुलभ होते.
SBI कडून ई-बँक गॅरेंटी सुरू करण्यात आल्यामुळे, आता बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय NESL पोर्टलचा वापर करून लगेचच ई-बँक गॅरेंटी मिळू शकेल. याबाबत SBI ने म्हंटले की, ई-बँक गॅरेंटी सुरू केल्याने बँक गॅरेंटीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होईल.
बँक गॅरेंटी म्हणजे काय ते जाणून घ्या ???
बँक गॅरेंटी द्वारे बँक खात्री करते की कर्जदाराच्या दायित्वांची पूर्तता केली जाईल. जर कर्जदार कोणत्याही कर्जाची परतफेड करू शकला नाही तर बँक त्याची पूर्तता करेल. बँक गॅरेंटीचा फायदा असा आहे की, यामुळे कर्जदाराला व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी अगदी सहजपणे कर्ज घेता येते.
ई-बँक गॅरेंटीमुळे काय फायदा होईल ???
इलेक्ट्रॉनिक गॅरेंटी अगदी सहजपणे प्रोसेस, व्हेरिफाय आणि डिलिव्हर केल्या जाऊ शकतात. साधारणपणे कागदावर आधारित बँक गॅरेंटीसाठी 3-5 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, इलेक्ट्रॉनिक बँक गॅरेंटी मध्ये ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही तासातच पूर्ण होतात. त्याच बरोबर या उपक्रमामुळे सर्व प्रकारच्या बँक गॅरेंटीची कागदपत्रेही सुरक्षित राहतील. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फसवणूकीची शक्यता देखील कमीच आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.sbi/
हे पण वाचा :
ESAF Small Finance Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, असे असतील नवीन व्याजदर
‘या’ Penny Stock ने एका महिन्यात तिप्पट नफा देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Bank Strike : महिनाअखेरीस सलग चार दिवस बँका राहणार बंद, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपावर जाण्याची घोषणा
IDBI Bank ने ग्राहकांना दिला झटका, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार
World Richest Man List 2023 : गौतम अदानींच्या मानांकनात घसरण, आता बनले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती