नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान, जैन बांधवाच्या पर्युषण पर्वाला सुरूवात झाली असून, या काळात मुंबईतील जैन मंदिर खुली करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं पर्युषण पर्वाच्या अखेरचे २ दिवस मुंबईतील ३ ठिकाणी जैन मंदिर उघडण्याची परवानगी दिली आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठानं हा निर्णय दिला. हा आदेश देताना न्यायालयानं म्हटलं आहे की,”ही सवलत इतर मंदिरं खुली करण्यासाठी वा मोठी गर्दी होणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवासाठी (गणेशोत्सवासाठी) देता येणार नाही,” असं स्पष्ट केलं आहे.
A Bench headed by Chief Justice SA Bobde said that this concession cannot be applied to any other temple or for Ganesh Chaturthi celebrations which involve large congregation. https://t.co/FLgVUwAqzc
— ANI (@ANI) August 21, 2020
सर्वोच्च न्यायालयानं मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरं प्रार्थनेसाठी खुली करण्यास परवानगी दिली आहे. पर्युषण पर्वाच्या अखेरचे २ दिवस म्हणजे २२ व २३ ऑगस्टला जैन मंदिरं खुली राहणार आहेत. मंदिरं खुली केल्यानंतर केंद्र सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचं पालन करण्यात यावं, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”