ठाणे : हॅलो महाराष्ट्र – शाळेच्या बस अपघाताचे (accident) अनेक प्रकार समोर आलेले आपण पाहिलेच असतील.अशाच पद्धतीची एक घटना अंबरनाथच्या ग्रीन सिटी कॅम्पस मध्ये घडली आहे. चालकाच्या चुकीमुळे हि बस उलटली (accident). सुदैवाने बस मधील असलेल्या कोणताही विद्यार्थ्याला काहीच झाले नाही. केवळ दोन विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अंबरनाथच्या ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली; घटना CCTV मध्ये कैद pic.twitter.com/x3eBwlhsJ1
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 26, 2022
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक खाजगी मिनी स्कूल बस ग्रीन सिटी संकुलात आली असता बस चालकांनी रिव्हर वूड बिल्डींग समोरील उतारावर बसला मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली (accident). या घटनेनंतर तेथील उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत बसमध्ये चढून विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढले आणि पोलिसांना याची माहिती दिली.
यावेळी बसमध्ये सुमारे 17 ते 18 विद्यार्थी उपस्थित होते. पण सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला काही झाले नाही. केवळ दोन विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाले आहेत. तर या प्रकरणी शाळा प्रशासनाने सांगितले की, ही स्कूल बस शाळेची नसून खाजगी बस आहे. या बसच्या माध्यमातून मुलांना शाळेत आणले जात होते. त्याच पद्धतीने या बसचा कोणताही विमा उतरवला नव्हता हे या घटनेमुळे (accident) समोर आले. पालकांनी त्यांच्या सोयीनुसार बस निवडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवल्याचे शाळेतील व्यवस्थापकांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!