नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमधील एका अपघाताचा (Accident) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकीस्वारांचा एक गट दिसत आहे. त्यांचा स्कॉर्पिओ कार चालवणाऱ्या एका माणसाशी वाद झाला. बाईकर्सच्या गटातील एकाने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. ज्यामध्ये कार चालकाने मुद्दाम एका दुचाकीस्वाराला धडक दिली आहे.
रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/sTRseFhxGN
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 6, 2022
हि धडक एवढी भीषण होती कि, दुचाकीस्वाराचे बाइकवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वार रस्त्यावरील दुभाजकाला धडकून खाली पडला. यानंतर चारचाकी कार चालक वेगाने तसाच पुढे निघून गेला. दिल्लीतील अर्जनगड मेट्रो स्टेशनच्या खाली रविवारी सकाळी ही घटना घडली आहे.
श्रेयांश असं घटनेचील दुचाकीस्वाराचं नाव असून, तो सुमारे 20 वर्षांचा आहे. मित्रांसोबत दुचाकीने प्रवास करून तो दिल्लीला परतत होता. दिल्ली पोलिसांनी या अपघाताची (Accident) गंभीर दाखल घेऊन तपास सुरु केला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर
रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी
दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू
अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर
वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान