स्टार्टअप्सचे गूगल, फेसबुक सारख्या कंपन्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी सेबीची मोठी तयारी, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अमेरिकन स्टॉक एक्सचेंज नॅस्डॅक (Nasdaq) ने गूगल (Google), फेसबुक(Facebook), अ‍ॅपल (Apple) , अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि नेटफ्लिक्स (Netflix) सारख्या अनेक टेक स्टार्टअप्स (Startups) ना मदत केली आणि आज या कंपन्या खूप मोठ्या झाल्या आहेत. हे लक्षात घेता मार्केट रेग्युलेटर सेबीने इनोव्हेटर्स ग्रोथ प्लॅटफॉर्म (IGP) च्या माध्यमातून भारतात नॅस्डॅक सारखे प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा प्रयत्न करीत आहे.

भारतातील स्टार्टअप कंपन्यांना IGP च्या माध्यमातून अशाच प्रकारे मदत मिळावी अशी सेबीची इच्छा आहे. मेक माय ट्रिप आणि यात्रा यासारख्या भारताच्या सुरुवातीच्या टेक स्टार्टअप कंपन्या नस्डॅकवर लिस्टेड आहेत. नॅस्डॅक टेक स्टार्टअप कंपन्यांची लिस्टिंग करण्यास खूपच उपयुक्त ठरले आहे, ज्यामुळे या कंपन्यांना बाजारातून फंड जमा करणे सुलभ झाले आहे. तरीही ReNew Power आणि ग्रॉफर्स सारख्या कंपन्या स्पेशल पर्पज अ‍ॅकव्हिझिशन कंपनी (SPAC) च्या माध्यमातून अमेरिकेच्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

झोमॅटोसह अनेक स्टार्टअप्सने IPO सुरू करण्याची तयारी दाखवली आहे
भारतातील अनेक स्टार्टअप कंपन्या IPO सुरू करणार आहेत. यात झोमॅटो, डेलीवेरी आणि नायका यांचा समावेश आहे. सेबीने नॅस्डॅक सारखे इनोव्हेटर्स ग्रोथ प्लॅटफॉर्म सोपे केले आहे. सेबीला भारतात स्टार्टअप कंपन्यांच्या लिस्टिंगला सपोर्ट करायचा आहे.

सेबीने आतापर्यंत स्टार्टअपना ही सुविधा दिली आहे
प्री-इश्यू होल्डिंग पीरियड सध्याच्या 2 वर्षांवरून 1 वर्ष करण्यात आला. यामुळे पात्र गुंतवणूकदारांना स्टार्टअप कंपन्यांचे वाटप करणे सुलभ होईल. आतापर्यंत फक्त BSE आणि NSE मध्ये लिस्टेड कंपन्यांकडेच ही सुविधा होती. सेबीच्या नवीन नियमांनुसार, IPO आणणारी कंपनी पात्र गुंतवणूकदारांना इश्यूच्या आकाराच्या 60 टक्क्यांपर्यंत वाटप करू शकते. त्याचा लॉक-इन कालावधी 30 दिवसांचा असेल. आत्तापर्यंत स्टार्टअप कंपन्यांना असे वाटप करण्यास परवानगी नव्हती. गुंतवणूकदाराची प्री-इश्यू शेअरहोल्डिंग प्री-इश्यू कॅपिटलच्या 25 टक्के करण्यात आली आहे. पूर्वी जी फक्त 10 टक्के होती.

स्टार्टअप्स फायदेशीर नाहीत तरीही स्टॉक एक्सचेंजच्या मेन बोर्डात समाविष्ट केले जाऊ शकतात
सेबीने म्हटले आहे की,”जर स्टार्टअप्स नफ्यात नसतील आणि त्यांचा 50 टक्केहून अधिक हिस्सा हा पात्र संस्थागत खरेदीदारांकडे असेल तरीही ते स्टॉक एक्स्चेंजच्या मेन बोर्डात सहभागी होऊ शकतात. पूर्वी ही मर्यादा 75 टक्के होती. इनोव्हेटर ग्रोथ प्लॅटफॉर्मवर लिस्टेड कंपनी ताब्यात घेण्यासाठी सध्याच्या 25 टक्क्यांऐवजी 49 टक्के ओपन ऑफर आणावी लागेल.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group