Wednesday, October 5, 2022

Buy now

उत्तरप्रदेश मध्ये भाजपचाच बोलबाला?? पहा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्चला असून भाजपलाच स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र भाजपच्या जागेत गतवेळी पेक्षा घट होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेश मध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. गत विधानसभा निवडणुकीत भाजपला 312 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपच्या जागा कमी झाल्या तरी पक्षाला पूर्ण बहुतम मिळेल असा अंदाज आहे. एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात

इंडिया टुडे-अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार भाजपला 288 ते 326 जागा मिळतील असा अंदाज आहे. समाजवादी पार्टीला (सपा) 71 ते 101 जागा मिळतील, बहुजन समाज पक्षाला (बसपा) 3 ते 9, काँग्रेसला 1 ते 3 आणि इतर पक्षांना 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टाईम्स नाऊचा एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मिळून 225 जागा मिळवू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्ष आणि इतरांना 151 जागा मिळू शकतात. तर बसपा 14, काँग्रेस 9 आणि इतरांना 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया न्यूजच्या सर्व्हेनुसार, भाजपला 222 ते 260, सपाला 135 ते 165, बसपाला 4 ते 9 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

News 18 च्या सर्वेनुसार भाजप – 240.. समाजवादी पक्ष – 140 , बहुजन समाज पक्ष – 17 तर इतर – 6 जागा

उत्तरप्रदेश निवडणूकीत भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अखिलेश यादव यांचे कडवे आव्हान होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासमवेत केंद्रीय मंत्र्यांनी उत्तरप्रदेशात केलेल्या जोरदार प्रचाराचा भाजपला फायदा झाला आहे.