हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून सीमा हैदर प्रकरण भारतामध्ये चर्चेचा विषय बनले आहे. प्रियकरासाठी पाकिस्तान सोडून आलेल्या सीमा हैदरने आता भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आता तिने रक्षाबंधननिमित्त थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राखी पाठवली आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना राखी पाठवली आहे. तसेच तिने या दोघांना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, सीमा हैदरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्वांना राखी पाठवली आहे. यावेळी तिने, “या सर्व प्रमुखांवर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यामुळे या राख्या पाठवण्यात आले आहेत. आशा आहे की रक्षाबंधन सणाच्या अगोदरच या राख्या त्यांना मिळतील” असे म्हणले आहे. आता सीमा हैदरने देखील भारतीय रितीरिवाजांचा स्वीकार केल्यामुळे ती हिंदू धर्मातील सण उत्सव साजरी करताना दिसत आहे.
दरम्यान, हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन सणाला विशेष महत्त्व देण्यात येते. यावर्षी 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण आला आहे. त्यामुळे या सणासाठी जल्लोषात तयारी करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, यावर्षी सीमा हैदरने थेट पंतप्रधानांना राखी पाठवली आहे. त्यामुळे आता या राखीच्या बदल्यात पंतप्रधानांकडून तिला काय भेटवस्तू मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सीमा हैदर प्रकरण
गेल्या काही महिन्यांपूर्वीच सीमा हैदर पाकिस्तानमधून पळून भारतात आली आहे. तिने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्याला पुन्हा पाकिस्तान मध्ये पाठवण्यात येऊ नये अशी विनंती तिने भारत सरकारला केली आहे. विशेष म्हणजे, तिने सर्व हिंदू रीतीरिवाजांचा स्वीकार केला आहे. भारतवासी असलेल्या सचिनसोबत सीमाची पबजी गेममुळे ओळख झाली होती. पुढे जाऊन या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आता हीच सीमा आपल्या चार मुलांसहित सचिनसोबत राहण्यासाठी भारतात आली आहे.