नवी दिल्ली : सावरकरांनी इंग्रजांकडे मागितलेल्या माफीचा इतिहास नष्ट करता येणार नाही. अशा परिस्थितीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिला तर आम्ही निषेध करू, तसेच त्याचा विरोध करू, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले की, सावरकर हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. ते तुरूंगात होते हे खरे आहे. पण हे देखील सत्य आहे की सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली. एक प्रकारे ते ब्रिटीशांशी हातमिळविणी करून काम करत होते, त्याबदल्यात त्यांना 60 रुपयांचे पेन्शन देण्यात येत होते.
शिवसेनेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाकाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानानंतर आणि काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेवरुन दोन्ही पक्षांत कटुता निर्माण झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या मतानंतर शिवसेना आणि काँग्रेस पक्षामध्ये कटुता काढण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने संसदेत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती
राहुल गांधी यांनी 14 डिसेंबर रोजी रामलीला मैदानावर झालेल्या मोर्चात बलात्कारासंदर्भात केलेल्या टिप्पणीला भाजपाने विरोध दर्शविताना म्हटले होते की, ‘माझे नाव राहुल गांधी नव्हे तर राहुल सावरकर आहे. मी कधीही माफी मागणार नाही. यानंतर सेवा दलाच्या पुस्तिकामध्ये महात्मा गांधींच्या मारेकरी नथूराम गोडसे आणि सावरकर यांच्यात कथित संबंध असल्याचे नमूद केले गेले. यावरुन वाद निर्माण झाला होता. यावर शिवसेनेने कडक आक्षेप घेतला होता.