मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसने उशिरा का होईना पण आपला विरोधी पक्ष नेता निवडला आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे. ते या आधी काँग्रेसचे विधी मंडळ उपनेते म्हणून काम पहात होते. राधा कृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर या पदी कोणाची निवड होणार याबाबत काँग्रेसने निर्णय घेतला आहे.
Senior Congress leader Vijay Wadettiwar appointed as the new leader of Opposition (LoP) in the Maharashtra Legislative Assembly. pic.twitter.com/MHgH6DZvLj
— ANI (@ANI) June 24, 2019
विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यानंतर त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कामाचा पाढाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहासमोर वाचून दाखवला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावण्याची एक हि संधी सोडली नाही. विरोधी पक्ष नेते म्ह्णून विजय वडेट्टीवार यांना अत्यंत कमी काळ मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मी शिफारस करतो कि, निवडणुकीनंतर देखील विजय वडेट्टीवार यांचीच निवड विरोधी पक्ष नेते पदी करावी कारण आम्हीच पुन्हा सत्तेत येणार आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकुलता एक खासदार निवडून आला आहे. त्या विजयासाठी विजय वडेट्टीवार यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांची या पदी निवड केली जाणार हे मात्र निश्चित मानले जात होते. त्यावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले आहे.