पुणे | सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी 2 नंतर ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही –
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
दरम्यान आजुबाजूला लोकवस्ती असल्याने आगीची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’