मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील जुहू येथे कामावरून काढल्याच्या रागातून एका नोकराने रागाच्या भरात मालकाच्या घरात 54 लाखांची चोरी (Theft) केली आहे. जुहू पोलिसांनी या आरोपी चोराला व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. सतिश सुरेश शिवगण आणि अंकुश मोंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेले दागिने आणि पैसे हस्तगत केले आहेत. मालकाने कामावरुन काढल्याच्या रागातून नोकराने मित्राच्या मदतीने मालकाच्या घरात चोरी (Theft) केली. याप्रकरणी मालकाने जुहू पोलीस ठाण्यात चोरीची (Theft) तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कसून शोध घेत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी सतिश शिगवण हा शिगवण हा विलेपार्ले येथील तर अंकुश मोंडे हा नालासोपारा येथील रहिवासी आहे.
कामावरुन काढल्याच्या रागातून केली चोरी
फिर्यादी हे जेष्ठ नागरिक असून व्यावसायिक आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा फिर्यादी यांच्या बंगल्यात नोकर म्हणून काम करत होता. महिनापूर्वी काही कारणावरुन मालकाने नोकराला कामावरुन काढून टाकले होते. याचा राग आल्याने आरोपीने मित्राच्या मदतीने मालकाच्या घरात चोरी (Theft) करण्याचा कट रचला. या आरोपी नोकराला मालकाच्या घराची सगळी माहिती होती. घरात पैसे कोठे ठेवतात, घरातील दागिने कोठे असतात, मालक घरात केव्हा येतात आणि बाहेर केव्हा जातात. त्यानुसार चोरीची योजना केली. यानंतर 16 जून रोजी मालक बाजारात गेले असताना नोकराने डुप्लीकेट चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला.
यानंतर घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाला. त्यानंतर फिर्यादी जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजले व त्यांनी तातडीने जुहू पोलीस ठाणे गाठत चोरीची (Theft) तक्रार दाखल केली. या चोरीची तक्रार दाखल होताच जुहूचे सहपोलीस निरीक्षक विजय धोत्रे आणि त्यांच्या पथकाने जुहू आणि आसपासच्या परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही स्कॅन करून, तसेच सीडीआर व डम डाटाचा तांत्रिक तपास करून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीची कसून चौकशी केली असता त्याने व त्याच्या मित्राने हि चोरी केल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडील चोरीचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली आहे.
हे पण वाचा :
Adani Group च्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 100 टक्क्यांवर रिटर्न !!!
IND vs IRE: आयर्लंडचे ‘हे’ 5 खेळाडू टीम इंडियावर पडू शकतात भारी
‘या’ Multibagger Stocks ने एका वर्षात गुंतवणूकदारांना मिळवून इतके पैसे !!!
टीम इंडियाचा धोखा टळला ! इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज टी 20, वन डे संघातून बाहेर