कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अखिल महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक सातारा सहकारी बँक मुंबईचे माजी चेअरमन माथाडी कामगार नेते पोपटशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थित रेठारे येथे झालेल्या कार्यक्रमात समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते कृष्णा सहकारी साखर कारखाना संलग्नित कृषी महाविद्यालयच्या पटांगणात उभारलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावर कार्यक्रमत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत,ना.नरेंद्र पाटील,पंढरपूर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष ना अतुलबाबा भोसले,ना.नितीन बानुगडे-पाटील,आ शंभूराजे देसाई,कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पोपट शेठ पाटील हे मूळचे कराड दक्षिण मतदार संघातील जिंती या गावचे रहिवासी आहेत. मुंबईत सहकार व कामगार क्षेत्रात कार्यरत असून त्याच्या मार्गदर्शनाखाली दर्यासागर व जनसागर पतसंस्था, अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून माथाडी कामगारांचे मुंबईतील विविध प्रश्नाबरोबत माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी माथाडी गृहनिर्माण संस्था स्थापन करून पाचशेपेक्षा अधिक माथाडी कामगारांना मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर मिळवून दिले आहे.
पोपटशेठ यांचे बरोबर अखिल महाराष्ट्र जनरल माथाडी कामगार युनियन चे कार्याध्यक्ष डी एस शिंदे,उपाध्यक्ष संभाजी कोळेकर,संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत रामीष्टे,सुरेश कोळेकर,सिताराम मोरे,बबनराव चिंचोळकर, प्रकाश पाटील यांचे सह माथाडी कामगार व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या –
मंत्री पद कस मिळवायचं हे माझ्याकडून शिकून घ्या : रामदास आठवले
भाजपच्या या खासदाराची लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड
भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या ‘या’ मतदारसंघात होत आहे नव्या उमेदवाराची मागणी
तासगाव विधानसभेला ‘या’ नेत्याला निवडून देण्याचे खा. संजय पाटील यांनी केले आवाहन
भाजपच्या कार्यकर्त्याचा सांगलीत खून
पवारांनी RSS चे कौतुक केल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….
अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका
शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक