वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्ध्यामध्ये अनियंत्रित मालवाहू ट्रकने कारला धडक दिल्याने एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त मालवाहू ट्रक चंद्रपूरकडून वर्ध्याकडे चालला होता. तर कार वर्ध्याकडून समुद्रपूरकडे चालली होती. या जखमींमध्ये एक महिन्याच्या बाळाचादेखील समावेश आहे. हा अपघात (Accident) वाघाडी नदीजवळ सायंकाळच्या सुमारास घडला आहे. या अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतला असता प्रकृती नाजूक असल्याने फिरके कुटुंबीयांना पुढील उपचारासाठी नागपूर तर मालवाहूतील जखमी दोघांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. समुद्रपूर पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कशाप्रकारे घडला अपघात ?
बुलडाणा जिल्ह्यातील नांदोरा येथील फिरके कुटुंबीय कारने गडचिरोली येथे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. दरम्यान शेडगाव आणि वाघाडी नदीजवळ चंद्रपुरकडून वर्ध्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो अनियंत्रित होऊन कारवर जाऊन धडकला. या भीषण अपघातात (Accident) एक महिन्याच्या लहान बाळासह सहा जण जखमी झाले आहेत. प्रवीण गजानन फिरके, सुभद्रा प्रवीण फिरके, शालिनी गजानन फिरके, संध्या प्रदीप नाकडे, राकेश राजू उईके, अमोल कुदमवार अशी या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
हे पण वाचा
‘या’ 4 घरगुती उपायांनी मानेचा काळेपणा करा दूर
इथं एक पोरगी मिळेना अन् ‘या’ पठ्ठ्यानं चक्क 3 जणींसोबत केलं एकाच वेळी लग्न
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर