धक्कादायक ! बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खामगाव : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. पीडित मुलीने आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. यानंतर आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकीकडे सावत्र मुलीचा विनयभंग आणि दुसरीकडे आरोपी वडिलांची आत्महत्या यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

५५ वर्षीय आरोपीने याअगोदरदेखील आपल्या 14 वर्षीय सावत्र मुलीचा विनयभंग केला होता. त्यावेळी हा आरोपी सात दिवस फरार झाला होता. यानंतर त्याने पुन्हा एकदा आपल्या मुलीचा विनयभंग केला. यामुळे पीडित मुलीनं आपल्या सावत्र वडिलांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी रविवारी 55 वर्षीय सावत्र बापाविरोधात बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपीने जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळफास लावून आत्महत्या केली.

हि घटना समजताच मृताच्या नातेवाईकांत आणि तक्रारदार मायलेकीत चांगलाचं वाद उफळला होता. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमधील वाद मिटवला. यानंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. आरोपीनं चुकीच्या आरोपांमुळे आत्महत्या केली की पश्चातापातून याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.