बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही, आशिष शेलारांची राऊतांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये सध्या जोरदार टीकास्त्र सुरु आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण तर कधी एखादी दुर्घटना घडली कि त्यावरून भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केले जातात. आज पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केल्यानंतर यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राऊतांवर टीका केली. बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी गाय, बैल होत नाही,” असे शेलार यांनी यावेळी म्हंटले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता असेल, असा विश्वास आज व्यक्त केला. त्यांनी म्हंटल कि, पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचा महापौर होईल. राऊत यांनी विश्वास व्यक्त केल्यानंतर त्यांना शेलार यांनी टोला लगावला आहे.

अभाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राऊतांवर टीका करताना म्हंटल आहे की,बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी गाय, बैल होत नाही, सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, अशी झाली आहे. पोलिसांकडून सध्या राज्यात फक्त वसुलीचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की स्वबळ असे करतात, कोण दिल्लीला जाते तर कोण बैठक घेत आहेत. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की 108 वेळा स्वबळाचा मंत्र जपत आहेत, अशा शब्दात शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली आहे.

You might also like