Friday, June 9, 2023

सिनेसृष्टीतून शाहरुख खान निवृत्ती घेणार? केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा ‘किंग खान’ अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचत आहे. तब्बल 1 हजार कोटी रुपयांची कमाई ‘पठाण’ने केली आहे. इतक्या कमाईनंतर आता शाहरुखने त्याच्या निवृत्तीबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

चार वर्षांनंतर शाहरुखने ‘पठाण’ मधून रुपेरी पडद्यावर कमबॅक केले. गेल्या आठवड्यात ‘पठाण’ने भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. अंदाजानुसार ‘पठाण’ने रविवारी बॉक्स ऑफिसवर 4.30 ते 4.50 कोटी रुपयांची कमाई केली.या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर त्याने ‘आस्क SRK’ सेशन घेतले. त्यावेळी त्याने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला.

यावेळी त्याला एक चाहत्याने “तुम्ही निवृत्ती घेतल्यानंतर सिनेसृष्टीतील सर्वात मोठी गोष्ट कोणती?” असा प्रश्न विचारला. “मी अभिनयातून कधीच निवृत्त होणार नाही. एकतर मला काढून टाकावे लागेल. तसे घडल्यास कदाचित मी अजून हॉट होऊन सिनेसृष्टीत परतेन”, असे शाहरुख खान याने म्हंटले.