सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जनशताब्दी वर्षास सुरवात होत आहे. या जनशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जन्मगाव असणाऱ्या वाटेगाव येथे विविध कार्यक्रमांचे करण्यात आल्याची माहिती मानवहीत लोकशाही पक्षाचे सचिन साठे आणि गणेश भगत यांनी दिली. दि. १ ऑगस्ट पासून या जन्मशताब्दी सोहळ्याची सुरवात अभिवादन सभेतून होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कन्हैया कुमार, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आजी माजी खासदार उपस्थित राहणार आहेत.
१ ऑगस्टपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्षास सुरवात होत आहेत. शासन स्थरावर अण्णाभाऊंच्या जनशताब्दी सोहळ्यासाठी उदासीनता दिसून येत असल्याने मानवहीत लोकशाही पक्षाच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांचा जनशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या निर्णय घेतला आहे. अण्णाभाऊ साठे यांचे जन्म गाव असणाऱ्या सांगली जिल्हयातील वाटेगाव या ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, सांगली शहराच्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य देशातील सर्व भाषेत भाषांतरित करावे, समाजावरील होणारे अन्याय आणि अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, सामाजिक न्यायाची योग्य ती भूमिका शासनाने घेऊन समाजाला न्याय द्यावा या सह अन्य विषयांवर या अभिवादन सभेमध्ये नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात येणार आहे.
या सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कन्हय्या कुमार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, लक्ष्मण माने यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे आणि सचिव गणेश भगत यांनी दिली. तसेच अण्णाभाऊ साठे हे मोठे साहित्यिक होते मात्र त्याच अण्णाभाऊंना शासनाने जिल्ह्यात कोणतेही स्थान दिलेलं नाही असा आरोप करत त्यांच्या जन्मगावी भव्यदिव्य स्मारक उभे राहण्यासह सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचा भव्यदिव्य असा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जण आंदोलन उभारणार असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली.