सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
राज्याच्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पगडा असून त्यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेनेही आपले मंत्री ठरविल्यामुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत यामुळेच खानापूर-आटपाडीचे आ.अनिल बाबर यांचे मंत्रिपद हुकल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी खानापुर तालुक्याला भेट दिली होती तेव्हा आ.बाबर यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता, असे विश्वसनीय वृत्त आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेना आघाडी मोडून ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावेळीच या सरकारवर शरद पवार यांचा पगडा असणार हे स्पष्ट झाले होते. शरद पवार यांच्या सल्ल्यानेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निर्णय घेत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
जे नेते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले ते याच घराणेशाहीला कंटाळून आले होते. मात्र शिवसेनेत आल्यावर देखील शरद पवारांच्या हस्तक्षेपामुळे अनेकांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे. तानाजी सावंत, दीपक केसरकर या दोन मंत्र्यांचा पत्ताही यावेळी कापण्यात आला. याबरोबरच भास्कर जाधव व अनिल बाबर यांचेही पत्ते कट करण्यात पवारांचाच हात असल्याची उघड चर्चा शिवसैनिकांतून होऊ लागली आहे.
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News
हे पण वाचा –
अब्दुल सत्तारांना ग्रामविकास तर बच्चू कडूंना शालेय शिक्षण व कामगार; पहा संपूर्ण खातेवाटप
मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी माझी नाराजी कायम – एकनाथ खडसे
इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल
मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते – देवेंद्र फडणवीस