हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर निशाणा साधला. निवडणुकीपूर्वीच काहीजण म्हणाले, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईन … मात्र मी त्यांना येऊ दिले नाही अस म्हणत पवारांनी फडणवीसांना चिमटा काढला.
शरद पवार उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, काही लोक निवणडणूक लागायाच्या अगोदर, निकाला आधीच मी येणार अस सांगत होते, पण आम्ही येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तसेच सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे असे पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे. शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रीत करून स्वराज्य उभं केलं, देशात अनेक राज्य झाली, कुठे मोगल झाले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असही ते म्हणाले.