हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून धमकी देणाऱ्यास पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. मात्र चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या उत्तराने मात्र पोलिसही चक्रावले आहेत. नारायण सोनीअसं या आरोपीचं नाव असून, तो मूळचा बिहारचा आहे. त्याची बायको त्याला सोडून गेली आणि तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. पवारांनी यामध्ये काहीही मध्यस्थी केली नाही याचा राग त्याच्या मनात होता.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नारायण सोनी याचे मानसिक संतुलन काही ठीक नाही. तो १० वर्ष पुण्यात राहिला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. मात्र दोघांचं बिनसल्याने दोघेही वेगळे झाले. त्यांनतर त्याच्या बायकोने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. शरद पवारांनी पती-पत्नीच्या भांडणाप्रकरणात काहीही कारवाई केली नसल्याचा राग नारायण सोनीच्या मनात होता. त्यातूनच त्याने शरद पवारांना धमकी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, धमकी प्रकरणी पोलिसांनी IPC च्या कलम 294, 506 (2) अंतर्गत सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आज (14 डिसेंबर) त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. गेल्या 4-5 महिन्यांपासून हा नारायण सोनी शरद पवारांच्या घरी फोन करून जीवे मारण्याची धमकी देत आहे