शरद पवारांनी लोकसभा निकालाआधीच सुरु केली विधानसभा निवडणुकीची तयारी

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला सहा महिन्याचा अवकाश असताना दिखील शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईत आमदारांची विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदारांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाना देखील पाचारण करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देखील हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक हि अत्यंत सावध स्वरूपात लढली आहे. लोकसभा निवडणुकीला उमेदवार देण्यापासून ते प्रचाराची सुसूत्रता लावण्यापर्यंत शरद पवार यांनी स्वतः जातीने लक्ष घातले आहे.अशात शरद पवार यांनी आता विधानसभेची तयारी एवढ्या लवकर सुरु केल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

भाजप नेहमीच दावा करते कि राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजपच्या नेमके कोणते आमदार संपर्कात आहेत. याचा तपास लावून त्यांच्या नाराजीचे मुद्दे नेमके काय आहेत. याचा शोध घेण्याचा प्रयत्न शरद पवार करणार आहेत. यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.